गौतम बुद्धाचे आर्थिक विचार - Softcover

बागडे, डॉ. रक्षित मदन

 
9789356101319: गौतम बुद्धाचे आर्थिक विचार

Inhaltsangabe

बुद्धाचा काळ म्हणजे इ.स.पूर्व सहावे शतक होय. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने ते ‘सम्यक क्रांती’चे युग होते. गौतम बुद्धाच्या मानवतावादी विचारसरणीने तत्कालीन समाजात मूलभूत परिवर्तन घडून आले. बुद्धाच्या धम्मात व्यवहारोपयोगी आणि समाजोपयोगी तत्त्वज्ञान दिसून येते. ‘बहुजन हिताय- बहुजन सुखाय’ असा लोकल्याणकारी संदेश देणारे बुद्ध लोकशाहीचे प्रथम प्रणेते होते. सर्व दुःखाचे मूळ तृष्णा होय हे सांगताना द्रव्यलालसेलाही गौतम बुद्धाने तृष्णेत अंतर्भूत केले आहे.
बुद्धकाळात भारतीय समाज हा आर्थिकदृदष्ट्या शेती, पशु पालन, व्यापारधंदे आणि कला ह्या उद्योगांवर अवलंबून होता. या सर्व आर्थिक पैलू बाबद बुद्धाने काय सांगितले आहे या सर्व बाबींचा यात विस्तारपूर्वक अध्ययन करण्यात आलेला आहे.

Die Inhaltsangabe kann sich auf eine andere Ausgabe dieses Titels beziehen.