ज्याचा मी इतके दिवस शोध घेत होतो ते माझ्या हाती आलं होतं का? मृत्युरेषेपलीकडच्या कशाला तरी हेमांगीचं मन स्पर्श करून आलं होतं का? तिला हिप्नॉसिसखाली घालताच हा नवा अवतार पृष्ठावर आला होता. याचा अर्थ हाच होता - तिच्यात नवीन काहीतरी सामावलेलं होतं. रेषेपलीकडचा तो स्पर्श संसर्गजन्य होता. या विचाराच्या गोंधळात सारखं वाटत होतं, आपण काहीतरी विसरलो आहोत- मग एकदम आठवलं! कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज! मोत्याचा आवाज! ज्याक्षणी तो लाल डोळा उघडला त्याच क्षणी मोत्यानं मोठमोठ्यानं भुंकायला सुरुवात केली होती. मला ते दिसलं होतं, मोत्याला लांबवरूनही जाणवलं होतं.
हे जे काही नव्यानं साकारलं होतं ते चांगलं नव्हतं, शुभ नव्हतं, कलंकित होतं. हेमांगीची शेवटच्या क्षणाची प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. जगाबद्दल, मागे राहणारांबद्दल राग, संताप, द्वेष, मत्सर... समसमासंयोग असा तर प्रकार नव्हता?
Die Inhaltsangabe kann sich auf eine andere Ausgabe dieses Titels beziehen.